शाहूवाडीत नगरपंचायत व्हावी यासाठी कृती समितीचा निवडणूकीवर बहिष्कार

शाहूवाडीत नगरपंचायत व्हावी यासाठी कृती समितीचा निवडणूकीवर बहिष्कार

शाहूवाडीत नगरपंचायतीसाठी
निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

शाहूवाडीः येथे नगरपंचायत व्हावी, यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीसह आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन येथील नगरपंचायत कृती समितीच्या वतीने आज तहसील कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन त्यावर ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पोवार यांच्या सहीने देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, १८ आॅक्टोबर २०२१ रोजीच्या ग्रामसभेत येथे ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायत व्हावी, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र वारंवार मागणी करूनही शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे व १० आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार कृती समितीच्या वतीने सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीसह आगामी सर्वच निवडणुकांवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com