

02564
मलकापूरला सौरऊर्जा प्रकल्पामुळे
वार्षिक साडेसात लाखांची बचत
मलकापूर, ता. २० ः येथील पालिका प्रशासनाने सहा ठिकाणी सौरऊर्जा पॅनेल बसवले आहेत. त्यातून शहरातील रस्त्यांवरील वीज, कचरा डेपो व शॉपिंग सेंटरची विद्युत व्यवस्था होणार आहे. त्यामुळे विद्युत बिलाचे वार्षिक साडेसात लाख रुपयांची बचत होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासक विद्या कदम यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ‘पालिकेला मिळणारे स्वउत्पन्न अत्यंत अल्प आहे. त्यामुळे इतर खर्चासह विद्युत बिलाचा मोठा बोजा पालिका फंडावर पडत होता. पर्यायासाठी माझी वसुंधरा ४.० अभियानअंतर्गत अग्नी घटकातून नियमानुसार ४५ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा राबविण्याची निर्णय झाला. त्यासाठी पालिका इमारत, शॉपिंग सेंटर इमारत, शिवाजी स्टेडियमजवळील माध्यमिक शाळा इमारत, कचरा डेपो व अग्निशमन इमारतीवर सौर पॅनेल बसवणिले आहेत.
त्या म्हणाल्या, ‘पालिकेवरील पॅनेलचा कार्यालयासाठी वापर होईल. इतर चार ठिकाणच्या पॅनेलमधून रस्त्यांवरील विजेसाठी तर शॉपिंग सेंटर व कचरा डेपोवरील पॅनेलमधून त्या त्या ठिकाणी वीज वापर होईल. यामुळे वीज बिलापोटी भरावी लागणारे साडेसात लाखांची बचत होईल. पालिका फंडावर पडणारा ताण कमी होईल, शिवाय अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरल्याने पर्यावरण जनजागृतीचा चांगला संदेश जनतेत जाईल. सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासकीय आधिकारी ऋषीकेश पाटणकर, मुख्य लेखापाल अशपाक बागवान, वरिष्ठ लिपीक महेश गावखडकर, स्वच्छता निरीक्षक सुनील सोळंकी, प्रदीप पाटील व अभियान समन्वयक अनुजा जाधव यांचे सहकार्य झाल्याचे प्रशासक विद्या कदम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.