शाळी नदी प्रदूषणाचे २० वर्षे भिजत घोंगडे , ठोस उपाय केंव्हा

शाळी नदी प्रदूषणाचे २० वर्षे भिजत घोंगडे , ठोस उपाय केंव्हा
Published on

02566, 02569

‘शाळी’ प्रदूषणाचे भिजत घोंगडे
ठोस उपाय कधी? : २० वर्षांपासून केवळ आश्‍वासनेच

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर, ता. २१ : प्रतिवर्षी दीपावलीनंतर ऐन उन्हाळ्यात मलकापूर-येळाणे दरम्यानच्या बंधाऱ्याजवळ शाळी नदीचे पात्र दूषित होते. वीस वर्षाहून अधिक काळाचे हे चित्र आहे. याच कारणाने या नदीवरील मुख्य नळपाणी योजना पालिकेला बंद ठेवावी लागली. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पालिकेला दूषित पाण्याबाबत नोटीसा दिल्या आहेत. शाळी नदी बचाव कृती समितीने आंदोलने केली आहेत. बंधाऱ्याखालील गावांनी दूषित पाण्याबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत. एवढे घडूनही कोणताही ठोस उपाय नदी प्रदूषणावर झालेला नाही.
मलकापूर आणि येळाणे गावच्या सीमेवरून शाळी नदी वाहते. माण येथील पालेश्वर मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. त्यामुळे उन्हाळ्यातही नदी प्रवाहित असते. दहा गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळते. मात्र नदीपात्रात मलकापूर व येळाणेतील गटारांचे सांडपाणी थेट मिसळत असल्याने हे नदीपात्र येथे दूषित होते आहे. त्यात प्लास्टीक व इतर कचऱ्याची भर पडते आहे. शेतीसाठी बंधाऱ्यात पाणी अडवले जात असल्याने ते अधिकच काळपट हिरवट व दुर्गंधीयुक्त बनते आहे. प्रतिवर्षी दीपावलीनंतर येथील नदीपात्राचे हे चित्र कायम असते. याबाबत वारंवार तक्रारी, आंदोलने झाली. सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहिमा राबवल्या. मात्र त्यावेळी केवळ आश्वासने दिली गेली. दूषित पाणी बांधाऱ्याखाली सोडून देणे हा एकच उपाय वारंवार होतो. सांडपाणी व प्लास्टिक कचरा नदीपात्रात थेट मिसळू नये यासाठी ठोस उपाययोजना लवकर होणे गरजेचे आहे.

कोट-
शाळी नदीपात्र दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळी नदी बचाव कृती समितीच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने केली. मात्र पालिका प्रशासनाने दिलेल्या अश्वासनांची पूर्तता केलीच नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर न झाल्यास आंदोलन करू.
- सुधाकर पाटील, शाळी नदी बचाव कृती समिती प्रमुख

येथील सांडपाणी प्राक्रिया प्रकल्पासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्यासाठी भूसंपादन,मूल्यांकन व अंदाजपत्रक तयार करणेचे काम चालू आहे.एजन्सीही नेमली आहे.अल्पावधीतच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.
- विद्या कदम, मलकापूर पालिका प्रशासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com