शाहूवाडीत धरण ,धबधबे परिसरातील वर्षा पर्यटनासाठी प्रवेशबंदी

शाहूवाडीत धरण ,धबधबे परिसरातील वर्षा पर्यटनासाठी प्रवेशबंदी

Published on

शाहूवाडीतील
पर्यटनस्थळावर
प्रवेशबंदी

शाहूवाडी ः तालुक्यातील मानोली, कांडवण, उखळू, पावणखिंड, केर्ली येथील धरण व धबधबे परिसरात वर्षा पर्यटनास जाण्यास तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी बंदी जाहीर केली. सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे. चव्हाण यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, संततधार पाऊसामुळे तालुक्यातील धरण, नद्या, ओढे यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. अशावेळी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तालुक्यातील पर्यटनस्थळावर पर्यटक मोठ्या प्रमाणावर जातात. पावणखिंड येथे तर ४० ते ५० फूट खोल दरी आहे. तेथे कोणी उतरू नये. यांसह या सर्वच ठिकाणांवर दुर्घटना घडू नये म्हणून प्रवेशबंदी घातली आहे. पावसाळ्यातील वाढते धोके लक्षात घेऊन आता तहसीलदार चव्हाण यांनी तालुक्यातील धरण व धबधबे परिसरात शाळांना पर्यटन सहली काढण्‍यासह बंदी घातली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.