मलकापूरातील विकास कामांसाठी ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर

मलकापूरातील विकास कामांसाठी ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर
Published on

मलकापूरला विविध कामांसाठी
साडेतीन कोटींचा निधी मंजूर
मलकापूर, ता. २९ ः येथे वाचनालय व बहुउद्देशीय सभागृह बांधणे, महादेव टेकडीवर बगीचा करणे, व्यायामशाळा बांधणे, जलशुध्दीकरण योजनेंतर्गत कामे करणे यासह विविध विकासकामांसाठी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रयत्नातून वैशिष्टयपूर्ण योजनेतून ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री एथनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून विकासकामांना निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार नगरविकास खात्याकडून विशेष अनुदान योजनेतून साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला. त्याबाबत नगरविकास खात्याकडून लेखी आदेशही मिळाला आहे.
मंजूर कामे अशी कंसात निधी; महादेव टेकडीवर बगीचा करणे (१ कोटी ३१ लाख), जलशुध्दीकरण योजनेंतर्गतची कामे करणे (७० लाख), वाचनालय व बहूउद्देशीय सभागृह बांधणे (५४ लाख), महादेव तरुण मंडळ येथे सामाजिक सभागृह व व्यायामशाळा बांधणे (२५ लाख), पाण्याच्या टाकीजवळ सामाजिक सभागृह व व्यायामशाळा बांधणे (२५ लाख), महादेव टेकडीवर काँक्रिट रस्ता करणे (२५ लाख), शाळी नदीघाट दुरुस्ती करणे (१० लाख), मुख्य चौकातील शिवतीर्थ परिसर विकसित करणे (१० लाख). या कामांसाठी निधी मंजूर व्हावा यासह कागदपत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांचेही विशेष सहकार्य झाल्याचे केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com