अश्विनी-अभय यांच्यात घनिष्ठ संबंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्विनी-अभय यांच्यात घनिष्ठ संबंध
अश्विनी-अभय यांच्यात घनिष्ठ संबंध

अश्विनी-अभय यांच्यात घनिष्ठ संबंध

sakal_logo
By

लोगो - अश्विनी बिद्रे खून प्रकरण

रत्नागिरीत टेडीबेअरमध्ये
स्पाय कॅमेरा मीच बसविला
साक्षीदार प्रशांत मोरेची साक्ष; उलटतपासणीही

पनवेल, ता. २० : अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर यांच्यात मध्यस्थी असलेला प्रत्यक्ष साक्षीदार प्रशांत मोरे याची साक्ष आणि उलटतपासणी शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयातील न्यायाधीश के. जी पालदेवार यांच्या न्यायालयात झाली. या वेळी प्रशांत मोरे याने अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर यांच्यातील संबंधांची माहिती न्यायालयासमोर दिली. अश्विनीच्या रत्नागिरी येथील घरातील हॉलमध्ये टेडीबेअरमधील स्पाय कॅमेरा आपणच बसविल्याचे, तसेच स्पाय कॅमेरा असलेले पेन आपणच अश्विनीला दिल्याचे प्रशांतने न्यायालयासमोर सांगितले.
जवळपास दोन तासांच्या उलटतपासणीत आरोपीच्या वकिलांनी प्रशांत मोरे याने दिलेली माहिती व त्यांचा जबाब खोडून काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो शेवटपर्यंत आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा महाविद्यालयीन मित्र प्रशांत मोरे आणि बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांची ओळख २०१२ पासून होती. या दोघांच्या संबंधाची माहिती प्रशांतला होती. त्यामुळे अश्विनी आणि अभय यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी सन २०१५ मध्ये तो कोल्हापूर येथून भाईंदर येथे आला होता. त्या वेळी हॉटेल फाऊंटनमध्ये प्रशांत, अश्विनी व कुरुंदकर यांच्यात चर्चा झाली होती. त्या वेळी अश्विनीने त्यांच्या मुलीच्या नावे ५० लाख, स्वतःच्या नावे ५० लाख आणि आजरा (जि. कोल्हापूर) येथील शेतजमीन आपल्या नावावर करावी, पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी, अशा मागण्या कुरुंदकरसमोर ठेवल्या होत्या. त्या वेळी अश्विनीने या मागण्या कधीपर्यंत पूर्ण करणार, याबाबत विचारणा केली होती. त्यावर कुरुंदकरने या सर्व गोष्टी मुलीच्या लग्नानंतर बघू, असे सांगून टाळल्या होत्या, असे प्रशांत मोरे याने न्यायालयासमोर सांगितले. पुढील सुनावणी २७ जानेवारी रोजी होणार आहे.