विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम

विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम

झ्वेरेव, शेल्टनची आगेकूच
विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम : महिला एकेरीत वँग, स्वितोलिनाचा विजय
लंडन, ता. ६ : चौथा मानांकित ॲलेक्झँडर झ्वेरेव व १४ वा मानांकित बेन शेल्टन या टेनिसपटूंनी शनिवारी विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅममधील पुरुषांच्या एकेरीत आगेकूच केली. झ्वेरेव याने कॅमेरून नोरी याला, तर शेल्टन याने डेनिस शॅपोवालोव याला पराभूत करीत पुढे पाऊल टाकले.

ॲलेक्झँडर झ्वेरेव याने कॅमेरून नोरी याच्यावर ६-४, ६-४, ७-६ असा सरळ तीन सेटमध्ये विजय संपादन केला. झ्वेरेव याने दोन तास व ३१ मिनिटांमध्ये विजय साकारला. या लढतीदरम्यान झ्वेरेव याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यामधून बाहेर येत त्याने विजय साकारला हे विशेष.
बेन शेल्टन याने डेनिस शॅपोवालोव याचा कडवा संघर्ष पाच सेटमध्ये मोडून काढला. डेनिस याने पहिला सेट ७-६ असा आपल्या नावावर केला. त्यानंतर शेल्टन याने ६-२ असे यश मिळवले. तिसऱ्या सेटमध्ये शेल्टन यानेच ६-४ अशी बाजी मारली. डेनिस याने चौथ्या सेटमध्ये ६-४ असा विजय संपादन केला व बरोबरी साधली. शेल्टन याने अखेरच्या सेटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला. त्याने हा सेट ६-२ जिंकला आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला. शेल्टन याने तीन तास व पाच मिनिटांत प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले.

जॅब्यूएर, डार्टचा पराभव
महिला एकेरीच्या लढतीत वँग शी व एलिना स्वितोलिना यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत घोडदौड केली. वँग शी हिने हॅरी डार्ट हिचे कडवे आव्हान २-६, ७-५, ६-३ असे तीन सेटमध्ये परतवून लावले. वँग शी हिने ही लढत दोन तास व १८ मिनिटांमध्ये जिंकली. एलिना स्वितोलिना हिने ओन्स जॅब्यूएर हिला ६-१, ७-६ असे नमवले.


---------------------------------------------------------------------------

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्णपदक

माद्रिद, ता. ६ ­­: पॅरिस ऑलिंपिकआधी विनेश फोगाटने स्पेनमधील ग्रँडप्रिक्स या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आत्मविश्‍वास कमवला. भारताच्या अनुभवी विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटात देदीप्यमान कामगिरी केली.
विनेश फोगाटने सुरुवातीला क्युबाच्या युसनेलिस गुजमॅन हिला १२-४ असे नमवले. त्यानंतर कॅनडाच्या मेडीसन पार्कस हिच्यावर मात करीत आगेकूच केली. उपांत्य फेरीत विनेश फोगाटसमोर कॅनडाच्याच कॅटी डचाक हिच्यावर ९-४ असा सहज विजय मिळवला. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत विनेश फोगाटने रशियाच्या मारीया तिऊमेरेकोवा हिच्यावर १०-५ अशी मात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com