कुस्तीत दोन सुवर्ण एक रौप्य,दुसरा दिवस. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्तीत दोन सुवर्ण एक रौप्य,दुसरा दिवस.
कुस्तीत दोन सुवर्ण एक रौप्य,दुसरा दिवस.

कुस्तीत दोन सुवर्ण एक रौप्य,दुसरा दिवस.

sakal_logo
By

मुरगूडच्या स्वाती, वैष्णवीचे सुवर्ण तर अस्मिताचे रौप्यपदक
मुरगूड, ता. ४ : शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथील महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशीही साई आखाड्याच्या कुस्तीगीरांची यशस्वी घोडदौड सुरु राहिली. महिला गटात मुरगूडच्या स्वाती संजय शिंदे हिने ५३ किलो गटात, तर वैष्णवी रामा कुशाप्पा हिने ७६ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. अस्मिता शिवाजी पाटील हिने ६२ किलो गटात रौप्यपदक पटकावले.
५३ किलो गटात स्वातीने सातारा व पुणेच्या महिला मल्लांना पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. पुणेच्या श्रद्धा भोरसोबत अंतिम लढत झाली. लढतीत स्वातीने एकेरी पट काढून भारंदाज डावावर १० गुण मिळवून तांत्रिक गुणधिक्याने चितपट केले.
७६ किलो वजन गटात वैष्णवी रामा कुशाप्पा हिने रायगड ,अहमदनगर , सातारा येथील महिला कुस्तीगीरांना पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. पुणेच्या साक्षी शेलार सोबत झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत वैष्णवीने दुहेरी पट काढून मोळी डावावर १० गुण मिळवून तांत्रिक चितपटीने विजय मिळवला आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. ६२ किलो वजन गटात अस्मिता शिवाजी पाटील हिने रायगड , सांगली , सातारा येथील महिला कुस्तीगरांना पराभूत करून अंतिम फेरी गाठली.अटीतटीने झालेल्या अंतिम फेरीत अस्मिताला पुणेच्या आकांक्षा नलावडेने २ गुणाने पराभूत केल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.