
शिंदेवाडीत ११ पासून नामसंकीर्तन
शिंदेवाडीत ११ पासून नामसंकीर्तन
मुरगूड : शिंदेवाडी (ता. कागल) येथे शनिवार (ता. ११) ते १९ फेब्रुवारीअखेर नामसंकीर्तन सप्ताह आहे. सोहळ्याचे ५५ वे वर्ष आहे. सोहळ्यात सायंकाळी ६.३० ते ७.३० वेळेत मारुती देवडकर, शशांक कोंडेकर (यमगे), मारुती लव्हटे (हणबरवाडी), पांडुरंग उपलाने (अवचितवाडी), शिवाजी वागवेकर (सरवडे), अशोकराव कौलकर (गारगोटी), दीपक पाटील (येडेनिपाणी-इस्लामपूर), पूर्णानंद काजवे (कोगनोळी) यांचे प्रवचन तर मारुती देवड़कर (यमगे), संदीप हातकर (महागोंडवाडी-आजरा), महादेव टेंमूकर (पंढरपूर), पांडुरंग उपलाने, डॉ. पन्हाळकर महाराज (जिंतूर), ज्ञानदेव टेंभूकर (पंढरपूर), सोपान टेंभूकर (पंढरपूर), पूर्णानंद काजवे यांचा कीर्तन आहे. सकाळी ८ ते १० पूर्णानंद काजवे महाराज यांचे काल्याचे कीर्तन त्यानंतर दिंडी, मिरवणूक, महाप्रसाद असून ५ ते ६.३० वा. काकडा भजन, सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ संत तुकाराम गाथेवरील भजन, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ ६.३० ते ७.३० प्रवचन आणि रात्री ८ ते १० वेळेत कीर्तन आहे. याचा लाभ घ्यावा.