Tue, March 28, 2023

मुरगूडला सोमवारी ‘जागर मायबोली’ कार्यक्रम
मुरगूडला सोमवारी ‘जागर मायबोली’ कार्यक्रम
Published on : 26 February 2023, 2:14 am
मुरगूडला सोमवारी ‘जागर मायबोली’ कार्यक्रम
मुरगूड : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अग्रणी महाविद्यालय अंतर्गंत ‘जागर मायबोली’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते होणार आहे. गायक रणजित कदम (मुरगूड), प्रगती कुंभार (गारगोटी), नीता कोळी (कोल्हापूर) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक डॉ. शिवाजी होडगे यांनी दिली. कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय मुरगूड अंतर्गंत बिद्री, निपाणी, कागल, सोळांकूर, भोगावती, गारगोटी, सरवडे, कापशी, राधानगरी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम सकाळी ११ ते २ या वेळेत होणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.