सोनगेचा तरुण वेदगंगेत वाहून गेला. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनगेचा तरुण वेदगंगेत वाहून गेला.
सोनगेचा तरुण वेदगंगेत वाहून गेला.

सोनगेचा तरुण वेदगंगेत वाहून गेला.

sakal_logo
By

03505
..

कुटुंबियांच्या डोळ्यादेखत
तरुण वेदगंगेत वाहून गेला

सोनगे येथील घटना ः आज पुन्हा शोधकार्य

मुरगूड,ता.७ : कागल तालुक्यातील बस्तवडे येथील वेदगंगा नदीवरील जुन्या पुलाजवळ कुटुंबासह अंथरुण धुण्यासाठी गेलेल्या सोनगे ( ता.कागल) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पत्नी, मुलांच्या डोळ्यादेखतच संजय आनंदा तोरसे (वय ४५) हा तरुण वाहून गेला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे.
संजय तोरसे मूळचा खडकेवाडा येथील असून सध्या सोनगे येथे राहत आहे. सकाळपासून सायंकाळी सातपर्यंत वेदगंगा नदीत पाणबुडी व रेस्क्यू फोर्सच्या बोटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरु होते. पण अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात येणार आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सोनगे येथील यात्रा बुधवारी (ता.१५) आहे. त्यामुळे तोरसे आपल्या कुटुंबासह बस्तवडे येथील वेदगंगा नदीवरील जुन्या पुलाजवळ अंथरुण धुण्यासाठी गेला होता. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वेदगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यात पुलाजवळ पाणीप्रवाह वेगवान होता. याठिकाणी भोवरा निर्माण झाल्याने संजयला पोहता येत असताना देखील त्या भोवऱ्यातून त्याला बाहेर येता आले नाही आणि पाण्याच्या प्रवाहासोबत तो दिसेनासा झाला. हे पाहून त्यांच्या मुलांनी आरडाओरड केला. काही तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण पाण्याच्या प्रवाहामुळे मदतकार्य करण्यात अडथळे निर्माण झाले. संजयसोबत त्याची आई, वडील, पत्नी, मुलगी सानिका व विक्रांत,अविष्कार ही त्याची दोन जुळी मुलेदेखील नदीकाठावर होती. त्यांच्या डोळ्यादेखतच हा प्रकार घडल्याने सर्वांनी एकच हांबरडा फोडला.