अवचितवाडी अंगणवाडी इमारत भूमिपूजन

अवचितवाडी अंगणवाडी इमारत भूमिपूजन

03579
भविष्यात गावे समृद्ध करूया
समरजितसिंह; अवचितवाडीत अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन
मुरगूड,ता.१० : तालुक्यातील समस्या कायम असल्याने आम्ही विधायक विकासकामांचा अजेंडा तयार केला आहे. त्या माध्यमातून गावं समृद्ध करुया, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले. अवचितवाडी (ता. कागल) येथे जिल्हा नियोजन फंडातून ११ लाख २५ हजार रुपये मंजूर झालेल्या नूतन अंगणवाडी इमारत बांधकामाचा भूमिपूजन प्रारंभ श्रुती गायकवाड या विद्यार्थीनीच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार अध्यक्षस्थानी होते. दत्तामामा खराडे, नारायण मुसळे, दगडू शेणवी प्रमुख उपस्थित होते. राजेखान जमादार म्हणाले, ‘शिंदे-फडणवीसांचे सरकार कृतिशील सरकार असल्याने भविष्यात खासदार संजय मंडलिक व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांना निवडून देवून सर्वांगीण विकास साधूया.’ उपसरपंच किशोरी कारंडे, कृष्णात कापसे, लक्ष्मण गायकवाड यांची भाषणे झाली संदीप भारमल यांनी स्वागत, उत्तम पाटील यांनी प्रास्ताविक तर पांडुरंग गायकवाड यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com