''खाजगी सावकारी'' ने घेतला तरुणाचा बळी.

''खाजगी सावकारी'' ने घेतला तरुणाचा बळी.
Published on

यमगे येथील तरुणाच्या
आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा

मुरगूड, ता.१८: यमगे (ता.कागल) येथील रोहित बाळासो पाटील (वय ३०) या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी मुरगूड पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुरगूडमधील प्रविण पांडूरंग भारमल याच्याकडून यमगे येथील सदाशिव आण्णासो महाजन याने ७० हजार रुपये कर्ज घेतले होते. या प्रकरणात यमगेतीलच रोहित पाटील याने कर्ज मिळवून देण्यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र सदाशिव महाजन याने कर्जाची रक्कम वेळेत परत केली नाही. त्यामुळे कर्ज देणाऱ्या प्रविण भारमलने मध्यस्थ रोहितच्या मागे तगादा लावला होता. दोन दिवसांत रक्कम नाही दिली तर जनावरे सोडून नेणार अशी धमकीही दिली होती. त्यामुळे रोहितने २८ जुलै रोजी त्याच्या मोबाईलच्या व्हॉटसअपवर सदाशिव महाजन व प्रविण भारमल या दोघांनी ४ लाख ६० हजार रुपये दे असा तगादा लावल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे स्टेट्स ठेवून शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तशी फिर्याद रोहितचे वडील बाळासो पाटील यांनी मुरगूड पोलिसांत दिली आहे.
दरम्यान,फिर्यादीनुसार प्रवीण भारमल आणि सदाशिव महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गजानन सरगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com