मुरगूड शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश सुरू

मुरगूड शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश सुरू

मुरगूड शासकीय
आयटीआयमध्ये प्रवेश सुरू

मुरगूड, ता. ६ : येथील शासकीय आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२४ च्या प्रवेश सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ३ जून २०२४ पासून सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जवळच्या आयटीआयमध्ये जाऊन तो कन्फर्म करायचा आहे. त्यानंतरच आपल्या आवडीचे व्यवसाय निश्चित करावयाचे आहेत. तसेच अर्ज भरण्याची १ जुलैपर्यंतच मुदत असल्याची माहिती प्राचार्य ए. एस. देसाई यांनी दिली. येथील आयटीआयमध्ये एक वर्ष कालावधीचे वेल्डर, पंप मेकॅनिक व ड्रेस मेकिंग तसेच दोन वर्षे कालावधीचे इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटार मेकॅनिक व फिटर हे अभ्यासक्रम आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी आयटीआयशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य देसाई यांनी केले आहे.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com