मुरगूडमध्ये अतिरेकी हल्ल्याचा निषेध

मुरगूडमध्ये अतिरेकी हल्ल्याचा निषेध

वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील
हल्ल्याचा मुरगूडमध्ये निषेध
मुरगूड, ता. १० : वैष्णोदेवीस जाणाऱ्या भाविकांच्या बसवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा येथे जाहीर निषेध करण्यात आला. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात चालकास गोळी लागल्याने बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या दुर्घटनेत १४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा देशात तीव्र निषेध करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून हिंदुत्ववादी संघटनेतर्फे मुरगूड शहरात निषेध करून पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले. यावेळी सर्जेराव भाट, जगदीश गुरव, ओंकार पोतदार, अजित कांबळे, विठ्ठल भुते, भगवान लोकरे, प्रकाश परिशवाड , संकेत शहा, शिवाजी चौगुले, मुरगूड शहरातील हिंदुत्वादी संघटनेचे सदस्य, शिवभक्त, नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com