नवीन कायद्याच्या माहितीसाठी मुरगूडमध्ये जनजागृती रॅली

नवीन कायद्याच्या माहितीसाठी मुरगूडमध्ये जनजागृती रॅली
Published on

4537
मुरगूड : येथे नवीन फौजदारी कायद्याच्या माहितीसाठी जनजागृती रॅली काढून माहिती पत्रके वाटण्यात आली.

.....
नवीन कायद्याच्या माहितीसाठी
मुरगूडमध्ये जनजागृती रॅली

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. २ : नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, या हेतूने मुरगूड पोलिस ठाण्यातर्फे शहरातून जनजागृती फेरी काढून फौजदारी कायद्याची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली.
नवीन फौजदारी कायदा व त्याचे स्वरूप याबद्दलची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली. फेरीत शिवराज विद्यालय, मुरगूड विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. बसस्थानक चौक, शिवाजी पुतळा, नगरपरिषद रोड, राजीव गांधी चौक, बाजारपेठ रोड अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थी तसेच नागरिकांना नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील माहिती पत्रके वाटप केली. तसेच मुरगूड पोलिस ठाणे येथे विद्यार्थी व नागरिकांना नवीन फौजदारी कायद्यामधील मुख्य बदलांची व हे कायदे १ जुलै २०२४ पासून अमलात आल्याची माहिती देण्यात आली.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com