मुरगूडला हजारो लिटर पाण्याची नासाडी.

मुरगूडला हजारो लिटर पाण्याची नासाडी.

Published on

05172

मुरगूडला हजारो लिटर पाणी वाया
पाणी टाकीतूनच गळती; उपाययोजनांची नागरिकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुरगूड, ता. २५ : येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील दररोज शेकडो पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. याबद्दल शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
चिमगांव रस्त्यावरील बिरोबा पाणंद येथे नव्याने पिण्याच्या पाण्याची उपसा टाकी बांधली आहे. येथे गळतीमुळे गेल्या काही दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. याला पालिका प्रशासनाचा पाणीपुरवठा विभाग जबाबदार आहे. याकडे लक्ष देण्यासाठी संबंधित विभागाला वेळच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाणे ही बाब निश्चितच गंभीर आहे. त्यामुळे यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी नगरपालिकेकडे नागरिकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
दरम्यान आज सकाळी नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालिकेत जाऊन पाणीपुरवठा विभागाला पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आणून दिले व ही पाणी गळती तातडीने काढावी, यासाठी निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्यासह दत्तात्रय मंडलिक, सर्जेराव भाट, जगदीश गुरव, समाधान हेंदळकर, विजय गोधडे, शशिकांत पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com