मंडलिक महाविद्यालयात प्रशिक्षण शिबिराचे संपन्न

मंडलिक महाविद्यालयात प्रशिक्षण शिबिराचे संपन्न

Published on

05183

मंडलिक महाविद्यालयात
प्रशिक्षण शिबिर संपन्न
मुरगूड, ता. २६ : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता कक्ष विभाग, वाणिज्य विभाग व अर्थशास्त्र विभाग आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेक्युरिटी मार्केट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर झाले.
प्रशिक्षणामध्ये सेबीमार्फत मोफत प्रशिक्षण जैनॉलॉजी विभाग, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरचे प्रा. डॉ. व्ही बी ककडे यांनी गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये त्यांनी गुंतवणुकीचे महत्त्व, गुंतवणुकीतील संधी, सेक्युरिटीज मधील गुंतवणुकीच्या पद्धती, संधी, स्टॉक मार्केट, गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी, सेक्युरिटी मार्केटमधल्या संधी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, एसआयपी अशा गुंतवणुकीबद्दलची माहिती दिली. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाअंतर्गत स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी करण्याच्या संधी कशा प्राप्त करून घेता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी होडगे, प्रा. डॉ. एम. एस. पाटील, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. राहुल बोटे, प्रा.तृप्ती गव्हाणकर, आरती गिरीबुवा, श्रेया कुंभा, प्रा. रामचंद्र पाटील, डॉ. गुरुनाथ सामंत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com