मुरगूडसाठी अद्ययावत नाट्यगृह देवू :  जयंत पाटील.

मुरगूडसाठी अद्ययावत नाट्यगृह देवू : जयंत पाटील.

Published on

05254

मुरगूडसाठी अद्ययावत
नाट्यगृह देऊ : जयंत पाटील

राजेखान जमादार यांचा वाढदिनी सत्कार

मुरगूड, ता. २५ : ‘‘मुरगूड नगरपरिषद संस्थानकालीन आहे.या शहरासाठी सव्वाशे कोटीचा निधी आणून त्याचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. आपण ही या शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी अद्ययावत नाट्यगृह बांधून देवू’’ अशी ग्वाही अलिबागचे माजी आमदार व शेतकरी कामगार पक्षाचे राज्य नेते जयंत पाटील यांनी दिली.
माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त जयंत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे अध्यक्षस्थानी होते. शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण प्रमुख उपस्थित होते. राजेखान जमादार म्हणाले, ‘‘नगराध्यक्षपदाच्या काळात ३५ वर्षांचा विकासकामांचा बॅकलॉग आपण भरुन काढला आहे.यापुढे ही शहर विकासासाठी पाहण्यासाठी प्रयत्नशील राहू.’ यावेळी शशिकांत खोत, आकाश दरेकर, विक्रम घाटगे यांची भाषणे झाली.
स्वागत विशाल सूर्यवंशी, प्रास्ताविक सत्यजित पाटील यांनी केले. अमर सणगर यांनी आभार मानले. यावेळी विजय भोसले,शेखर सावंत,दत्ता पाटील,दिनकर कोतेकर,मसू पाटील, सूर्याजी घोरपडे,पुनम महाडिक,जयसिंग टिकले,रणजित मुडुकशिवाले,स्नेहलता बाडकर,कैलास जाधव,आर.एस.पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com