

05262
कोल्हापूरचं राजकारण
ढवळून निघंल,
राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल : बाळूमामांच्या भंडाऱ्यात डोणे महाराजांची भाकणूक
मुरगूड, ता. २७ : ‘‘राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल, कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघंल,देशात नवीन कायदा येणार, मोठी महामारी येईल, उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी, जलाशय आटून जातील, होईल होईल जलप्रलय होईल, जलाशयाला मोठं भगदाड पडंल, वादळं, भुईकंप होईलं, त्यानं जगाची उलथापालथ होईलं. अशी भाकणूक कृष्णात डोणे महाराज यांनी केली.
आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्रीक्षेत्र सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात बुधवारी जागर झाला. गुरुवारी पहाटे संत बाळूमामा मंदिरासमोर कृष्णात डोणे महाराज यांनी कथन केलेल्या भाकणुकीचा (भविष्यवाणी) गोषवारा असा : आदमापूर हे गाव दुसरी काशी आहे. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील.बाळू धनगराचा वाडा बघण्यासाठी जगातून माणसे येतील. वाड्याच्या पायऱ्या सोन्याच्या होतील. नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळी भागात नंदनवन होईल. हिंदू धर्माची संस्कृती परदेश आत्मसात करतील, देशात समान नागरी कायदा येणार, राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल, गावातला मनुष्य जंगलात राहील, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जयजयकार होईल, हिंदू धर्माची पताका जगात मिरवेल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, उन्हाळ्याचा पावसाळा होईल अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल, नीतिमत्तेनं राहशीला तर सुखात राहशीला, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल. वैरणीला सोन्याची किंमत येईल,धान्यांची व वैरणीची चोरी होईल. यावेळी मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्षा रागिनी खडके, सचिव संदिप मगदूम यांच्यासह विश्ववस्त उपस्थित होते. भाकणूकीसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भक्त उपस्थित होते. यावेळी झालेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.