‘डबल महाराष्ट्र केसरी’ अमृता पुजारीचा सत्कार

‘डबल महाराष्ट्र केसरी’ अमृता पुजारीचा सत्कार
Published on

6329
मुरगूड : येथे डबल महाराष्ट्र केसरी विजेती अमृता पुजारीचा सत्कार करताना समरजितसिंह घाटगे. सोबत दादासो लवटे.

‘डबल महाराष्ट्र केसरी’ अमृता पुजारीचा सत्कार
मुरगूड : ‘कोल्हापूरची युवा कुस्तीपटू अमृता पुजारी हिने ‘डबल महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावून कोल्हापूरची मान उंचावली,’ असे गौरवोद्गार शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काढले. येथे अमृता पुजारी व तिचे प्रशिक्षक दादासो लवटे यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील अमृता पुजारीने सोलापूर येथे पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी ‘डबल महाराष्ट्र केसरी’ किताबावर नाव कोरले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com