मुरगूड पोलीस गणेश मंडळांची बैठक.

मुरगूड पोलीस गणेश मंडळांची बैठक.
Published on

06540
मुरगूड : येथे सार्वजनिक मंडळांच्या बैठकीत आप्पासाहेब पवार यांंचा सत्कार करताना क्रांती पाटील. शेजारी अनिकेत कुडले, सुहासिनीदेवी पाटील आदी.


ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव
साजरा करा : आप्पासाहेब पवार
मुरगूड येथे ५७ गावांतील मंडळांची बैठक

मुरगूड, ता. २६ : यंदाचा गणेशोत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त आणि समाजोपयोगी उपक्रमांनी मंडळांनी उत्साहात साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पवार यांनी केले. येथे मुरगूडसह परिसरातील ५७ गावांतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
श्री. पवार म्हणाले, ‘अज्ञानतेतून किंवा अजाणतेपणाने केलेल्या कोणत्याही कृत्याचा भविष्यात परिणाम होणार नाही, याची मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी. नगरसेवक सम्राट मसवेकर, सुनील रणदिवे, माजी प्राचार्य महादेव कानकेकर, राजेश पाटील, ओंकार पोतदार, सुनील पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, रघुनाथ बोडके, नीलेश पाटील, आर. के. पाटील, धनाजी वायदंडे, अशोकसिंह काईत, कृष्णात भुते आदींचा सत्कार झाला. मुख्याधिकारी अतिश वाळुंज, कृष्णात कुरणे, आप्पासाहेब पवार आदी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक अनिकेत कुडले यांनी स्वागत केले. सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत गोजारे यांनी आभार मानले.
उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com