दुग्ध व्यवसायात तरुणांचा वाढता सहभाग

दुग्ध व्यवसायात तरुणांचा वाढता सहभाग

लोगो ः बीग स्टोरी
------
‘दूध व्यवसायाचे चित्र टाकावे)

दूध व्यवसायातून मिळतेय ‘अर्थ’बळ
तरूणांचा वाढला सहभाग; शासनाने प्रोत्साहन दिल्यास बेरोजगारी होईल कमी

सचिन चौगले
नंदगाव ः पूर्वी दूध व्यवसायाकडे जोडधंदा किंवा दुय्यम व्यवसाय म्हणून पाहिले जात होते. नोकरी व शेती करत हा व्यवसाय केला जात होता. कुटुंबाला लागणाऱ्या दुधापुरताच मर्यादित हा व्यवसाय केला जात होता. वाढती लोकसंख्या व बेरोजगारीचा विचार करून खात्रीशिर व्यवसाय म्हणून आज तरुण दुध व्यवसायाकडे पाहत आहे. शासनाने या व्यवसायाकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन दिले तर बेरोजगारी कमी होईल.

कोरोनानंतर वाढली संख्या
कोरोना काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडल्यानंतर बेरोजगार म्हणून घराकडे परतलेले अनेक तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. लॉकडाउनमध्ये दुग्ध व्यवसायामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पहायला मिळाले.

सोशल मीडिया व आधुनिक तंत्राची मदत
सोशल मीडियाचा वापर करून त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीद्वारे दुग्ध व्यवसायात नवनवीन प्रयोग होत आहेत. आधुनिक तंत्राचा वापर करून कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त नफा कसा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुरघासचा वापर
चारा टंचाईवर मात करण्यासाठी 500 ते 1000 किलोच्या बॅगेमध्ये मुरघास भरून साठवला जातो. ‘गोकुळ’कडून संबधित दूध संस्थेकडून शिफारस पत्र आणल्यानंतर त्यावर अनुदान देवून ती दुध उत्पादकाला दिली जाते

मुक्तसंचार गोठा
सध्या मुक्तसंचार गोठ्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये गोठ्यातील सर्व जनावरे अगदी मोकळी फिरतील एवढ्या जागेमध्ये तारेचे किंवा काट्यांचे कुंपण करून जनावरांना त्यामध्ये मुक्त संचार करता येईल या हेतूने सोडले जाते. यामुळे जनावर निरोगी राहून दवाखान्यावर होणारा बराच खर्च कमी होतो व जनावरांच्या होणाऱ्या सर्व प्रक्रिया ही वेळत होतात. यामध्ये जनावरांना लागणारे पाणी व सावली यांची व्यवस्था कलेली असते.


दुधापासून अन्य व्यवसाय
फक्त आपल्या गोठ्यातील जनावरांचे दूध काढून ते दूध संस्थांना न घालता त्यापासून अनेक दुग्धजन्य पदार्थ तयार करून त्यांची विक्री अनेक तरुणांनी भरपूर पैसा कमवला आहे. तसेच हे करत असताना अनेक गरजू लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

बाजारपेठ दारात
सध्ये जास्तीत जास्त दुध उत्पादक आपल्याकडे कसे येतील यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. यासाठी इतर दूध संस्थांच्या तुलनेत अधिक दर व अन्य सुविधाही दिल्या जात. याचाच फायदा उठवून जास्त दूध देणाऱ्या खासगी संघांकडे दूध उत्पादकाचा कल वाढत आहे.

अर्थसहाय्य मिळते पण...
दुग्ध व्यवसायामध्ये इतर समाजाच्या तुलनेत समाजाच्या मराठा समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात आहेत. या समाजाच्या तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांकडून अर्थ साहाय्य केले जाते. परंतु अर्थसहाय करणाऱ्या बँकांच्या अटीमध्ये विविधता आढळतो. बँकांनी कर्जासाठी लागणाऱ्या अटींमध्ये एक सारखेपणा ठेवला तरच भविष्यात आणखीन तरुण व्यवसायाकडे वळतील.

सरकारी नोकरी असूनही दुग्ध व्यवसाय.....
गुडाळ (ता. राधानगरी) येथील विनायक पाटील जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर येथे शिपाई म्हणून कार्यरत आहे. व त्याचाच मित्र सुनिल पाटील कोल्हापूर पोलिसात कार्यरत आहे. दोघांचेही वय 33 इतके आहे. वडिलोपार्जित असलेला दुग्ध व्यवसाय दोघांनी एकत्र येऊन आधुनिक पद्धतीने करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन माहिती गोळा करुन गोठ्याची उभारणी केली व सध्या त्यांच्या गोठ्यामध्ये 13 ते 15 गाई आहेत. यासाठी ते दोघेही सकाळी पाच ते साडे सात पर्यंत दिवसभराच्या व्यवस्थापनासाठी गोठ्यात हजर असतात. नंतर ते दोघे ही कामावर निघून जातात. मासिक वेतनवर एक मजुर ठेवला आहे.व गोठ्यामध्ये जनावरांवर लक्ष देता यावे व सुरक्षेच्या हेतूने सी.सी.टी.व्ही.बसवले आहेत. सध्या त्यांचे दूध संकलन 200 ते 225 लिटरच्या आसपास आहे. महिन्याकाठी सर्व खर्च वजा होऊन एक लाख तीस हजारच्या दरम्यान त्यांना नफा राहतो. मनात आणले व थोडं कष्ट केले तर यातून चांगला पैसा उभारू शकतो यासाठी तरूनांनी या व्यवसायाकडे वळावे असे त्यांनी सांगितले.

कोट
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता सोशल मीडिया व आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करावा. नोकरीपेक्षाही चांगला पैसा आपण यातून कमावू शकतो
-विनायक पाटील, दुध उत्पादक, गुडाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com