माध्यमिक विद्यालय दऱ्याचे वडगाव येथे  विविध कार्यक्रम

माध्यमिक विद्यालय दऱ्याचे वडगाव येथे विविध कार्यक्रम

Published on

00381
दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) : येथे माध्यमिक विद्यालयातर्फे परिसरात वृक्षारोपण करताना संस्थेचे अध्यक्ष एस. एन. पाटील, माधवी पाटील, सरपंच छायादेवी मुळीक, राणी मगदूम व मान्यवर.

दऱ्याचे वडगाव शाळेत विविध उपक्रम
नंदगाव : माध्यमिक विद्यालय, दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथे शाळेसाठी विविध कार्यक्रम झाले. या शाळेस कै. प्रमिला गुरव यांच्या स्मरणार्थ बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी राजन पाटील व शुभांगी पाटील यांनी विद्यालयास फरशी बसवण्यासाठी पन्नास हजार रुपयांची देणगी दिली. या कामाचा प्रारंभ अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. एन. पाटील यांच्या हस्ते झाला. विद्यालयासाठी खोदलेल्या कूपनलिकेच्या पाण्याचे पूजन संस्थेच्या सचिव माधवी पाटील यांच्या हस्ते झाले. माजी सरपंच अनिल मुळीक यांनी विद्यालयास पाण्याचा कुलर भेट दिला. संस्थेचे अध्यक्ष पाटील, सरपंच छायादेवी अनिल मुळीक, माजी उपसरपंच राणी मगदूम व मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक के. एस. मगदूम यांनी प्रास्ताविक केले. डी. बी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. यु. के. पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.