विद्यार्थीनीं शालेय जीवनात ध्येय निश्चित करून वाटचाल करावी - विकास चौगले  चौगले परिवारातर्फे कै. बाबुनाना चौगले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान.

विद्यार्थीनीं शालेय जीवनात ध्येय निश्चित करून वाटचाल करावी - विकास चौगले चौगले परिवारातर्फे कै. बाबुनाना चौगले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान.

Published on

17056
नंदगाव : गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करताना सुवर्णा चौगले, विकास चौगले, बी. एस. किल्लेदार, ज्योत्स्ना चौगले, रविंद्र चौगले व मान्यवर.

चनिशेट्टी विद्यालयातील विद्यार्थांना शिष्यवृत्ती प्रदान
नंदगाव : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच पालक व शिक्षकांचे मागदर्शन घेऊन ध्येय निश्‍चित करून त्यांचा पाठलाग केल्यास यश मिळेल, असा विश्‍वास गुरुदत्त शुगर्सचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी व्यक्त केला. निगवे खालसा येथील चनिशेट्टी विद्यालयामध्ये चौगले परिवारतर्फे दहावीतील गुणवंत विद्यार्थांना कै. बाबुनाना चौगले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. एन. पाटील होते. विद्यालयातील दहावीत प्रथम पाच क्रमांक पटकवणारे विद्यार्थी मयुरी कडते, प्रांजल पाटील, धनश्री पाटील, सर्वेश किल्लेदार, सोहम कांजर या विद्यार्थींना शिष्यवृत्ती देण्यात आली. दौलत शिक्षण संस्थेचे सचिव बी. एस. किल्लेदार, संचालक राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सुवर्णा चौगले, ज्योस्ना चौगले, रविंद्र चौगले, आर. आर. किल्लेदार, शहाजी किल्लेदार उपस्थित होते. मुख्याध्यापक आर. वाय. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परिट यांनी सूत्रसंचालन केले. बी. वाय. कदम यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.