

00653
ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभाग घ्या
डी. के. गोर्डे; येवती फाट्यावर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नंदगाव ता. २ ः ‘‘ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे गुन्हेगारीस आळा बसेल. त्यामुळे इस्पुर्ली परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन क्रांती घडवावी,’’ असे सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी सांगितले. ते येवती फाटा (ता. करवीर) येथे इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेबद्दल मार्गदर्शनावेळी बोलत होते. यावेळी नागरिकांना सुरक्षा यंत्रणेची माहिती व प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिकही दाखवले.
ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला मदतच होईल. त्यामुळे ती प्रत्येक गावामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवू. त्यासाठी प्रत्येकाने ‘माझं गाव माझी जबाबदारी’ असे समजून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन इस्पुर्ली ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षका टी. ए. मगदूम यांनी केले. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या प्रयत्नातून इस्पुर्ली पोलिस ठाण्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे विभागीय अधिकारी गणेश लोकरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलिस ठाण्याच्या अंमलदारासह ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांचे सरपंच, पोलिसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, आशा, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिसमित्र उपस्थित होते.
चौकट
सरपंचांची पदरमोड
ग्राम सुरक्षा यंत्रणेसाठी प्रत्येक कुटुंब वार्षिक ६० रुपये खर्च आहे. ग्रामपंचायतींनी तो खर्च १५ व्या वित्त आयोगातून करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींना दिले आहेत. मात्र यासाठी ग्रामपंचायतीवर भार न टाकता दऱ्याचे वडगावच्या सरपंच छाया अनिल मुळीक, नागावचे सरपंच सतपाल मगदूम व गिरगावचे सरपंच राजाराम कांबळे यांनी पदरमोड करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्यांचा सत्कार झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.