बटकणंगले बातमी व फोटो

बटकणंगले बातमी व फोटो

02304
फुले हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप
नेसरी : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिकणारी बटकणंगलेची विद्यार्थिनी रोहिणी रवींद्र कांबळे हिच्या शिक्षणाची जबाबदारी रिक्षाचालक बाबूराव सदाशिव पाटील यांनी उचलली आहे. इयत्ता सहावीपासून इयत्ता दहावीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. रोहिणीच्या वडिलांचे दोन-तीन वर्षांपूर्वी अचानक निधन झाल्याने तिच्या शिक्षणाचा प्रश्न चर्चेत आला होता. त्यावेळी बाबुराव पाटील यांनी पुढाकार घेऊन शिक्षणासाठीची मदत देण्याचा निर्धार केला. त्यानुसार रोहिणीला वेळोवेळी शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. यावेळी मुख्याध्यापक विजय गुरबे, पर्यवेक्षक के. आर. माने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com