नेसरी रवळनाथतर्फे मदत

नेसरी रवळनाथतर्फे मदत
Published on

2769
नेसरी ः रवळनाथतर्फे नामदेव दळवी यांना धनादेश सुपूर्द करताना उपाध्यक्षा मीना रिंगणे. शेजारी संचालिका रेखा पोतदार, शाखाध्यक्ष आर. बी. पाटील, डॉ. व्ही. के. दळवी, अशोक सुळकुडे, उत्तम दळवी.
...........
‘रवळनाथ'' तर्फे सभासदाच्या
वारसाला दोन लाखांची मदत

नेसरी, ता. ३ : श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी-स्टेट) प्रधान कार्यालय गडहिंग्लज संस्थेच्या सभासद वंदना नामदेव दळवी (रा. नेसरी) यांचे नुकतेच निधन झाले. रवळनाथ संस्थेच्या सभासद कल्याण निधीतून त्यांच्या वारसाला दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. ''रवळनाथ''च्या उपाध्यक्षा मीना रिंगणे यांच्या हस्ते नामदेव दळवी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
उपाध्यक्षा मीना रिंगणे म्हणाल्या, ‘सभासद, ठेवीदारांच्या, विश्वासावरच संस्थेने अल्पावधीत उतुंग प्रगती केली आहे. त्यामुळे संस्थेने नेहमीच सभासदांच्या हिताचे धोरण राबवले आहे. सभासदांचा वेळोवेळी सन्मान करण्याची संधी संस्थेने सोडलेली नाही. संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी स्थापनेपासून सभासदांच्या हितासाठी सभासद कल्याण निधी उभारला आहे. निधीतून नैसर्गिक व अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबाला आधार दिला जातो. सभासदांच्या सुखदुःखात सहभागी होण्यामुळेच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.’
यावेळी रवळनाथच्या संचालिका रेखा पोतदार, नेसरी शाखा अध्यक्ष आर. बी. पाटील, शाखा सल्लागार डॉ. व्ही. के. दळवी, प्र. व्यवस्थापक अशोक सुळकुडे, शाखाधिकारी उत्तम दळवी उपस्थित होते.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com