Sat, April 1, 2023

सीआयआय महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी रॉबीन बॅनर्जी , उपाध्यक्षपदी हकीमुद्दीन अली
सीआयआय महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी रॉबीन बॅनर्जी , उपाध्यक्षपदी हकीमुद्दीन अली
Published on : 16 March 2023, 11:53 am
02557, 02558
....
सीआयआय महाराष्ट्र राज्य
परिषदेच्या अध्यक्षपदी बॅनर्जी
नागाव : सीआयआय ( कॉन्फीडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीज) महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी कॅप्रिहान्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष रॉबिन बॅनर्जी यांची तर उपाध्यक्षपदी दालमिया सिमेंटचे कार्यकारी संचालक हकीमुद्दीन अली यांची निवड करण्यात आली. सीआयआयच्या महाराष्ट्र राज्य परिषदेत या निवडी जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य परिषदेने २०२२ - २३ या वर्षासाठी ‘शाश्वतता, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाद्वारे सशक्तीकरण वाढ ’ ही थीम स्वीकारली आहे. यामध्ये लहान आणि मध्यम उद्योगांना समर्थन देणे, उत्पादन आणि आयटीसारख्या प्रमुख क्षेत्रांच्या वाढीस प्रोत्साहन देणे. तसेच या क्षेत्रात कार्यरत कामगार आणि कर्मचाऱ्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश असेल.