कासारवाडीत तीन लाखाच्या दागिण्याची चोरी

कासारवाडीत तीन लाखाच्या दागिण्याची चोरी

Published on

कासारवाडी येथे घरफोडी
नागावः कासारवाडी ( ता. हातकणंगले) येथे रविवारी रात्री दोन बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला.
कासारवाडी येथील जोंधळे गल्लीमध्ये शंकर भाऊ जोंधळे यांचे राहते घर आहे. अपघातात जखमी असल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. घरी कोणी नसल्याने घराला कुलूप होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करुन सोन्याचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. त्यांच्या शेजारीच रहात असणारे त्यांचे भाऊ पहाटे पाचच्या सुमारास आपला दरवाजा उघडत नसल्याने दरवाज्याला बाहेरून कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इतरांना फोन करुन बाहेरील कडी काढण्यास सांगितले. त्यानंतर पलिकडील घरातील चोरीचा प्रकार उघडकीस आला. तसेच शेजारीच असणाऱ्या सागर जोंधळे यांच्याही घरात चोरीचा प्रयत्न झाला. पण चोरट्याच्या हाती काही लागले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.