शियेत ग्रामदैवत हनुमान पालखी सोहळा उत्साहात

शियेत ग्रामदैवत हनुमान पालखी सोहळा उत्साहात

03191

शियेत हनुमान पालखी सोहळा
यात्रा उत्साहात ः विविध धार्मिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

शिये, ता. २५ : ‘बजरंग बली की जय, मारुतीच्या नावानं चांगभलं...’ असा जयघोष करत गुलाल व खोबऱ्याच्या उधळणीत येथील ग्रामदैवत श्री हनुमानाचा पालखी सोहळा उत्साहात झाला. या पालखी सोहळ्यासाठी भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता श्री हनुमान जन्मसोहळा झाला. बुधवारी यात्रेच्या मुख्य दिवशी गावच्या वतीने श्री हनुमंताना महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भजन, मारुती स्तोत्र व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळपासून मंदिर परिसरात खेळणी-पाळणे , मिठाईचे स्टाॅल उभारले होते. या ठिकाणी महिला व लहान मुलाांनी गर्दी केली होती. दुपारी चारपासून देवाला नैवेद्य देण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. सायंकाळी सातच्या सुमारास सरपंच शीतल मगदूम यांच्या हस्ते पंचारती झाल्यानंतर मारुतीच्या नावानं चांगभलं...च्या जयघोषात पालखी गाभाऱ्याबाहेर आणण्यात आली. यावेळी राजाराम साखर कारखान्याचे संचालक विलास जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, जयसिंग काशीद, जयसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान पालखी ग्राम परिक्रमेसाठी मार्गस्थ होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पालखी मार्गावर सडा-रांगोळी घालण्यात आली होती. चौका-चौकात पालखीवर गुलाल-खोबरे व फुलांचा वर्षाव करुन पालखीचे स्वागत करण्यात येत होते. महिला पालखीला पाणी घालून दर्शन घेत होत्या. रात्री नऊच्या सुमारास उत्सवमूर्तीला जलाभिषेक घालण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com