स्क्रॅप व्यवसायात पाच कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक

स्क्रॅप व्यवसायात पाच कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक

पाच कोटी चाळीस लाखांची
स्क्रॅप व्यवसायात फसवणूक

शिरोली एमआयडीसी पोलसांत दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. १५ : स्क्रॅप व्यवसायात पाच कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भावेश्वरी इंडस्ट्रीजचे विनायक सुकुमार लाड यांच्या फिर्यादीवरून रचना अॅग्रो सर्व्हिसेसचे कल्पेश बाळासो कुंभार व पीपी ट्रेडर्सचे पांडुरंग मारुती कुंभार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
लाड यांच्या वडिलांचा भावेश्वरी इंडस्ट्रीज या नावाने स्क्रॅप व्यवसाय होता. २०२३ मध्ये विनायकच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने सध्या हा व्यवसाय बंद आहे. पण, २०२१ मध्ये लाड यांनी भावेश्वरी इंडस्ट्रीजच्या नावाने रचना अॅग्रो सर्व्हिसेसला मोठ्या प्रमाणात स्क्रॅप विक्री केली. यामध्ये सीआय बोरिंग व एम. एस. स्क्रॅपचा समावेश होता. सुरवातीचे काही व्यवहार चांगले झाले. रचना अॅग्रो सर्व्हिसेसचे कल्पेश बाळासो कुंभार यांनी आर्थिक व्यवहारही ठरलेल्या वेळेत पूर्ण केले. त्यामुळे भावेश्वरी इंडस्ट्रीज व रचना अॅग्रो सर्व्हिसेस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले. नेमका याचाच गैरफायदा घेत कल्पेश कुंभार यांनी पीपी ट्रेडर्सचे पांडुरंग मारुती कुंभार यांना लाड यांच्या संपर्कात आणले. नंतरच्या काळात रचना अॅग्रो सर्व्हिसेस व पीपी ट्रेडर्सचे उधारीवर मालाची खरेदी सुरू केली. उधारीवर मालाची देवाण-घेवाण करताना स्टॅम्पवर स्वाक्षरी करत कल्पेश कुंभार व पांडुरंग कुंभार यांनी लाड यांना थकीत रक्कम परत देण्याबाबत विश्वास व्यक्त केला.

उधारी मोठी झाल्याने रक्कम देण्यास टाळाटाळ
दरम्यानच्या काळात भावेश्वरी इंडस्ट्रीजने पाच कोटी चाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा माल रचना अॅग्रो व पीपी ट्रेडर्सला विकला होता. उधारीची रक्कम मोठी झाल्याने कल्पेश कुंभार व पांडुरंग कुंभार यांनी लाड यांना रक्कम परत करण्यासाठी टाळाटाळ केली. खोटी आश्वासने देऊन कुंभार फसवत असल्याचे लाड यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com