प्रदूषण मुक्तीसाठी देशी वृक्ष लागवड गरजेची ; डॉ. मधुकर बाचूळकर

प्रदूषण मुक्तीसाठी  देशी वृक्ष लागवड गरजेची ; डॉ. मधुकर बाचूळकर
Published on

03285
शिरोली : स्मॅक भवन येथे डॉ. मधुकर बाचूळकर यांचे स्वागत करताना ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेन्द्र जैन. यावेळी भरत जाधव, आय. ए. नाईक, अजय रानगे, बदाम पाटील, एम. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.

प्रदूषणमुक्तीसाठी देशी वृक्ष लावा
डॉ. मधुकर बाचूळकर : स्मॅक भवन येथे बैठक
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. ७ : कोल्हापूरच्या प्रदूषण मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर देशी वृक्ष लागवड करून ती जगविणे ही काळाची गरज आहे. देशी झाडे लावून हा परिसर निसर्गरम्य बनविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्‍येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले.
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील स्मॅक भवन येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टच्या ‘कोल्हापूरचा पारा ४१ अंश ते पुन्हा ३६ अंश करणे’ या पर्यावरण चळवळ उपक्रमांतर्गत आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक हे होते. ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेन्द्र जैन, सचिव भारत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाचूळकर म्हणाले, ‘शिरोली एमआयडीसी परिसरात देशी झाडे लावली पाहिजेत. त्याचबरोबर त्याची नोंद ठेवणेही भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहेच. पण, त्याचबरोबर अनावश्यक वृक्ष तोडीस विरोध केला पाहिजे. विकास करताना निसर्गाचा विचार करून समतोल राखणे गरजेचे आहे.’
कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी पर्यावरण चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सुमारे ८०० देशी झाडे लावून पर्यावरणपूरक सुंदर औद्योगिक वसाहत साकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्मॅक’चे अध्यक्ष जैन यांनी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी पर्यावरण चळवळ संदर्भात माहिती दिली.
यावेळी संचालक राजू पाटील, भरत जाधव, बदाम पाटील, ज्‍येष्ठ उद्योजक एम. वाय. पाटील, सहायक अभियंता अजय रानगे, शिवाजी विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक अभिजित जाधव, किशन गिरी, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.