भारत - अमेरीकेतील व्यावसायिक संबंध सुदृढ होण्यासाठी धोरणातील निश्चितता, सातत्य आणि पारदर्शकता हवी ; माईक हॅन्की
03375
कागल : येथील कस्तुरी फाऊंड्रीच्या भेटीप्रसंगी अमेरिकन वकिलातीचे प्रमुख माईक हॅन्की. शेजारी निरज झंवर, भरत जाधव व नरेंद्र झंवर.
भारत-अमेरिकेतील व्यावसायिक संबंध
सुदृढ होण्यासाठी धोरण सातत्य महत्त्वाचे
माईक हॅन्कीः झंवर ग्रुपच्या कस्तुरी फाऊंड्रीला भेट
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २७ : भारत-अमेरिका यांच्यातील व्यावसायिक संबंध अधिक सुदृढ होण्यासाठी भारतामधील व्यावसायिक धोरणातील निश्चितता, सातत्य आणि पारदर्शकता महत्त्वाची आहे, असे मत अमेरिकेच्या मुंबई येथील वकिलातीचे प्रमुख (कौन्सिल जनरल) माईक हॅन्की यांनी व्यक्त केले. हॅन्की दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर होते. यामध्ये आज त्यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील झंवर ग्रुपच्या कस्तुरी फाऊंड्रीला भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. झंवर ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र झंवर, व्यवस्थापकीय संचालक निरज झंवर, रोहन झंवर, कोल्हापूर निर्यात विभागाचे प्रमुख अमर जाधव, अविनाश चिकनीस प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूरचे फाऊंड्री उद्योजक आणि अमेरिकेतील उद्योजकांत विशेष बैठक घेण्यात येईल, असे हॅन्की यांनी सांगितले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आणलेली सर्व समावेशकता कोल्हापुरात पाहायला मिळाली. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उद्योगात महिलांचा सहभाग वाढवत त्यांना आवश्यक सुरक्षितता पुरविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकी वकिलातीचे उपप्रमुख रेयान मुलेन, जनसंपर्क अधिकारी सुमेधा रायकर, झंवर ग्रुपच्या संचालिका जिया झंवर, अंकिता झंवर, मार्केटिंग विभागप्रमुख नितीन इनामदार, सोर्सिंग विभागप्रमुख अमोघ गुळवणी, आदी उपस्थित होते.
चौकट
नियमातील अनिश्चितता
गुंतवणूकदारांसाठी असुरक्षित
अमेरिकन इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर (सेमी कंडक्टर) भारताने सर्वाधिक कर लावला आहे. भारत-अमेरिकेमधील ट्रान्सपोर्ट व्यवस्था औद्योगिक उत्पादनांसाठी पुरेशी नाही आणि नियमातील अनिश्चितता अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी असुरक्षित वाटते, असे हॅन्की यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

