बेरोजगार तरुणांना औद्योगिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे

बेरोजगार तरुणांना औद्योगिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे

Published on

लोगो - टुडे १ वर आहे.
- भाग ३

उद्योगांत शेकडो संधी; मात्र स्थानिक बेरोजगारांची पाठ
युवकांना प्रोत्साहन देत रोजगाराकडे वळविण्यासाठी सरकारचे प्रयत्न हवेत

अभिजित कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २५ : कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या शेकडो संधी आहेत. मात्र, स्थानिक बेरोजगार युवकांनी विविध कारणांमुळे औद्योगिक कामाकडे पाठ फिरवली आहे. या युवकांना प्रोत्साहन देऊन औद्योगिक क्षेत्रात रोजगाराकडे वळविण्यासाठी सरकारची मदत हवी आहे. कोल्हापूरच्या तुलनेत पुणे, मुंबईमध्ये मिळणारे वेतन चांगले असल्याने कोल्हापुरातून बाहेर पडण्याचा तरुणांचा कल मोठा आहे.
पण पुणे, मुंबईत जादा वेतन मिळूनही शिल्लक काही राहात नाही. मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केल्यामुळे पदोन्नती ही मर्यादित राहते. त्याऐवजी लघु आणि मध्यम उद्योगांत कौशल्य विकसित होऊन स्वयंरोजगाराला चालना मिळते. रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून शासन बेरोजगारांना रोजगाराच्या संधी देत आहे. पण, हे करताना युवकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
औद्योगिक आणि मूलभूत प्रशिक्षण केंद्रांना एसइझेड (स्पेशल इकॉनॉमिक झोन) अंतर्गत अनुदान मिळाल्यास उद्योगाला आवश्यक कुशल मनुष्यबळाची पूर्तता त्या-त्या औद्योगिक वसाहतींत होऊ शकेल. प्रशिक्षणार्थी कामगारांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने ठराविक कालावधीसाठी विशेष शिष्यवृत्ती जाहीर केल्यास मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यास मदत होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत उद्योग कितीही रोबोटिक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण झाले, तरी किमान मनुष्यबळाची आवश्यकता कायम राहणार आहे. फाउंड्री उद्योगात आजही फेटलिंग, पेंटिंग, पॅकिंग आदी कामांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सध्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालकडील मजूर उपलब्ध आहेत. पण, मजुरीच्या शोधात आलेल्या या परप्रांतीय मजुरांना आता रस्ते विकासासारख्या कामांत ज्यादा मजुरी देऊन घेतले जाते. जागतिक बाजारपेठ ही गुणवत्तेबरोबरच स्पर्धात्मक दरावरही अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी येथील सूक्ष्म व लघु उद्योगांना वेतन मर्यादा ही ओलांडता येत नाही. परिणामी आणखी काही दिवसांत हे परप्रांतीय मजूरही औद्योगिक कामातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवणार आहे.
औद्योगिक क्षेत्रात कष्ट जास्त आणि मोबदला कमी असे समीकरण असल्याचा भ्रम तयार झाला आहे. स्थानिक बेरोजगार युवक औद्योगिक वसाहतीत काम करण्यासाठी निराशावादी आहे. या युवकांना आशावादी बनवून औद्योगिक विस्ताराच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय स्तरावर विशेष प्रयत्न गरजेचे आहेत. स्थानिक युवकांना औद्योगिक प्रवाहात आणण्यासाठी शाळा, महाविद्यालयातूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
--
- काय करायला हवे-
* बेरोजगार युवकांचे प्रबोधन गरजेचे
* खासगी आयटीआयला शिक्षकांच्या वेतना एवढे अनुदान
*औद्योगिक क्षेत्राची निगडित शासकीय योजना
* स्पेशल इकॉनॉमिक झोनअंतर्गत सुविधा
* युवकांना औद्योगिक प्रवाहात आणण्यासाठी शाळा, महाविद्यालयातूनच प्रयत्न
--
कोट
औद्योगिक संघटनांकडून चालविण्यात येणाऱ्या आयटीआयला शिक्षकांच्या वेतनाएवढे अनुदान शासनाने दिल्यास विद्यार्थ्यांना अल्पदरात औद्योगिक प्रशिक्षणाची सोय देता येईल. यामुळे आयटीआय कडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल. आणि प्रशिक्षित तरुण उद्योगातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढेल.
- प्रशांत शेळके, अध्यक्ष, स्मॅक आयटीआय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com