सूक्ष्म आणि लघु उद्योगाला निर्मिती उद्योगात रुपांतरीत करण्याचे आव्हान

सूक्ष्म आणि लघु उद्योगाला निर्मिती उद्योगात रुपांतरीत करण्याचे आव्हान

Published on

लोगो टडे १ वर
उद्योगाच्या वेगाला
समस्यांचे आव्हान
भाग - ४
--
सूक्ष्म, लघु उद्योगाला निर्मिती उद्योगांसाठी चालना हवी
‘स्टार्टअप''मधून प्रोत्साहन हवे; मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र देईल नवी दिशा
अभिजित कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २५ : सूक्ष्म आणि लघु उद्योगाला मशिनिंग चार्जेसवरून निर्मिती उद्योगात रूपांतरित करत स्टार्टअपच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास, एखाद्या वस्तूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी लघु व मध्यम उद्योगांची एकत्रित येऊन काम करण्याची तयारी, आवश्यक क्लस्टर योजना, मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र योजना आदी माध्यमांतून उद्योगाच्या विस्ताराला नवी दिशा देता येऊ शकते.
सध्‍या कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात वाहन निर्मिती उद्योगाशी निगडित उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फाउंड्री अॅन्‍ड इंजिनिअरिंग हबमुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगातील गुंतवणूक म्हणजे किमान सीएनसी आणि व्हीएमसी मशीन, तर मध्यम उद्योगातील गुंतवणूक म्हणजे कमाल सीएनसी, व्हीएमसी, एचएमसी किंवा व्‍हिटेलसह थोडी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील गुंतवणूक, असे सूत्र बनले आहे. त्यामुळे गुंतवणूक करून काम शोधणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. याचा परिणाम मशिनिंग चार्जेसवर होऊन प्रतितास दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत. यामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगाला मशिनिंग चार्जेसवर (मशिनसह मजुरीवर) काम करावे लागते. यात नुसतीच उलाढाल होते आणि मिळणारा नफा मात्र नोकरीतील उत्पन्नापेक्षा कमी असतो. त्यामुळे झालेली गुंतवणूक आणि आर्थिक देणी सांभाळताना संबंधित लघु उद्योजकाला मालक म्हणून स्वयंरोजगारी करून ठेवते. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी निर्मिती उद्योगात संधी आहे. काही प्रमाणात अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट, डिफेन्स आणि रेल्वे यासाठीचे प्रयोगही सुरू आहेत. त्याचप्रमाणे विद्युत उपकरणे, डोमेस्टिक, फूड आणि औषध निर्मिती उद्योग क्षेत्राशी निगडीत उत्पादनाचा विचार व्हायला हवा. सूक्ष्म आणि लघु उद्योगात कार्यरत असणाऱ्या उद्योजकांना यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि करावी लागणारी गुंतवणूक ही एक समस्या आहे.

हे करावे
*सहकारी तत्त्‍वावर क्लस्टर करून योजनांचा लाभ घेता येईल का? याचा विचार हवा
*जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून औद्योगिक विकास महामंडळाने प्रोत्साहन द्यावे
*आवश्यक परवाने मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणे गरजेचे
*निर्मिती उद्योगांना वीजदरात, व्याजदरात आणि करात सवलत मिळाली तर गुंतवणूकदार आकर्षित होतील
*मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र योजना मराठी उद्योगाला चालना देण्यासाठी उपयुक्त

विश्वासार्हता गुंतवणुकीचे
धाडस निर्माण करेल
केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देशाच्या २८ राज्यांत आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेतले जाऊ शकते. त्याचप्रमाणे आयात होणाऱ्या वस्तूंची माहिती घेऊन पर्यायी उत्पादनाचा विचार होऊ शकतो. ही सर्व माहिती केंद्र आणि राज्य सरकारने एका पोर्टलवर उपलब्ध करून दिल्यास त्याची विश्वासार्हता गुंतवणुकीचे धाडस निर्माण करेल.

कोट
शिवाजी विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक उत्पादने बनविली आहेत. त्याचा उपयोग लक्षात घेऊन निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास उद्योगक्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध होईल.
- बदाम पाटील, संचालक व खजिनदार, स्मॅक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com