

माजी उपसंचालक
वैशाली जामदार यांना अटक
मेंढे पसार; बनावट शालार्थ आयडी प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २३ : बनावट शालार्थ आयडी प्रकरणात गेल्या तीन दिवसांपासून अटकसत्र सुरू आहे. बुधवारी माजी विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल पारधी यांना अटक केल्यानंतर प्रभारी उपसंचालक चिंतामण वंजारी यांना सायबर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आता दोन माजी उपसंचालकांच्या अटकेचे वॉरंट निघाले असून, त्यानुसार छत्रपती संभाजीनगरातून माजी नागपूर विभागीय उपसंचालक वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय भंडारा परिसरातील सेवानिवृत्त उपंसचालक आणि माजी खासदारांचे बंधू सतीश मेंढे पसार असल्याची माहिती समोर आली आहे.
बनावट शालार्थ आयडी प्रकरणात २०१९ ते २०२४ पर्यंत तयार करण्यात आलेल्या शालार्थ आयडीचा तपास केला जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकारी माधुरी सावरकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीत चिंतामण वंजारी यांचा समावेश होता. या समितीच्या अहवालाच्या आधारावर माजी उपसंचालक उल्हास नरड यांच्या निर्देशानुसार सायबर सेलला नीलेश वाघमारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करीत, सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, त्यानंतर उल्हास नरड यांनाच गडचिरोलीतून अटक करण्यात आली. तेव्हापासून या प्रकरणात अटकसत्र सुरू आहे.
ट्रान्झिट वॉरंटच्या माध्यमातून अटक
वैशाली जामदार यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले होते. दरम्यान, त्यांना अटक करून नागपुरात आणण्यासाठी चोवीस तासांच्या वर कालावधी लागणार असल्यास त्यासाठी न्यायालयाची संमती घेत, त्यांना अटक करीत नागपुरात आणण्यात येत आहे. यावेळी सीताबर्डी ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक मुलानी, सहायक पोलिस उपनिरीक्षक चिखलीकर आणि सदर ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश होता.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.