नानीबाई चिखली - किर्तन महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - किर्तन महोत्सव
नानीबाई चिखली - किर्तन महोत्सव

नानीबाई चिखली - किर्तन महोत्सव

sakal_logo
By

कौलगेत १४ पासून
कीर्तन महोत्सव
नानीबाई चिखली ता. १२ ः परिवर्तन सामाजिक विकास संस्था अंतर्गत परिवर्तन गुरुकुलतर्फे शनिवार (ता. १४) ते मंगळवारी (ता. १७) जानेवारी दरम्यान कौलगे (ता. कागल) येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वरीमधील नवव्या अध्यायाचे अर्थ विवेचनासह सार्थ पारायण होणार आहे. १४ रोजी सकाळी ९ वाजता ध्वज व वीणापूजनाने प्रारंभ होईल. दररोज पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ, सायंकाळी सहा ते सात वाजता प्रवचन व रात्री सात ते नऊ वाजता कीर्तन होईल. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे (पुणे) यांचे प्रवचन तर प्रमोद जगताप (बारामती) यांचे कीर्तन आहे. १५ रोजी भाऊसाहेब पाटील महाराज (शेकीन हसूर) यांचे प्रवचन तर भाषाप्रभू जगन्नाथ पाटील (मुंबई) यांचे कीर्तन आहे. १६ रोजी वासकर फडाचे प्रमुख राणा वासकर (पंढरपूर) यांचे प्रवचन तर संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज गोसावी (पैठण) यांचे कीर्तन होईल. १७ रोजी सकाळी नऊ वाजता सचिन पवार (पुणे) यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होईल. उत्सवात दररोज सकाळी ८ ते १० वेळेत होणाऱ्या सार्थ ज्ञानेश्वरी पारायणाचे अधिष्ठान सचिन पवार यांच्याकडे असेल.