नानीबाई चिखली - एनसीसी विभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - एनसीसी विभाग
नानीबाई चिखली - एनसीसी विभाग

नानीबाई चिखली - एनसीसी विभाग

sakal_logo
By

01855

‘देवचंद’मध्ये बक्षीस वितरण
नानीबाई चिखली ः देशसेवेचे स्वप्न पाहताना खडतर परिश्रम आणि त्यागाची तयारी ठेवली तरच यशस्वी होऊ. देवचंद महाविद्यालयातील छात्रसेनेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कर्नल संजीव सरनाईक यांनी केले.
अर्जुननगर (ता. कागल) देवचंद महाविद्यालयातील छात्रसेना व व्हाईट आर्मी विभागाचे बक्षीस वितरण झाले.याप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. प्रशांत शाह अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्हाईट आर्मीप्रमुख अशोक रोकडे, उपप्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे उपस्थित होते.
अशोक रोकडे म्हणाले, ‘व्हाईट आर्मीत देवचंद महाविद्यालयाचे योगदान महत्त्वाचे आहे.’ प्राचार्य शाह म्हणाले, ‘यशस्वी अन् गुणवंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिक वाढविला.’ छात्रसेना विभागप्रमुख डॉ. अशोक डोनर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सैन्यात निवड तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार झाला. डॉ. प्रशांत शाह, विक्रम भोसले, तेजश्री पाटील, राणी गुरव, शुभम चव्हाण, प्रथमेश मलाबादे यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य अशोक पवार, पर्यवेक्षक प्रभाकर जाधव, छात्र उपस्थित होते. राणी गुरव, मयुरी चौगुले यांनी सूत्रसंचालन, सलोनी जबडे यांनी आभार मानले.