

02164
खडकेवाडा-नानीबाई चिखली रस्ता खड्ड्यांत
एक कोटीवर खर्च ः दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नानीबाई चिखली, ता. २८ ः अडीच वर्षांपूर्वी तयार केलेल्या खडकेवाडा-नानीबाई चिखली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांचा वाहनधारकांना लवकर अंदाज येत नसल्याने रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. रस्त्यासाठी कोट्यवधींचा खर्च झालेला निधी व अल्पावधीतच रस्त्याची होत असलेली चाळण पाहता नागरिक, वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
साधारण सव्वातीन किलोमीटर लांबीचा असलेला हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मार्च २०२३ मध्ये पेठवडगावच्या कंपनीकडून पूर्ण केलेला आहे. यासाठी सुमारे एक कोटी बारा लाखांचा निधी खर्ची पडला आहे. मात्र अडीच वर्षांतच रस्त्याला मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. यामुळे येथे किरकोळ अपघात घडत आहेत. हा रस्ता वर्दळीचा आहे. शिवाय सध्याचा हंगाम ऊसतोडणीचा असल्याने याच रस्त्यावरून ऊसवाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान ज्या कंपनीने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे त्याच कंपनीकडे रस्त्याची देखभाल दुरुस्ती पाच वर्षासाठी आहे. असे असतानाही कंपनीने तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे पाहायला मिळत आहे. खड्डे लवकरात लवकर भरून घ्यावेत व होणारे अपघात टाळावेत; अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
------------
कोट
अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे भरून मिळावेत यासाठी ग्रामपंचायतीसह स्वतः प्रशासनासह संबंधित ठेकेदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, याकडे संबंधितांनी अजूनही लक्ष दिलेले नाही.
- बी. एस. कांबळे, सरपंच, खडकेवाडा
खडकेवाडा - चिखली रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेकडे वर्ग केला असल्यामुळे पंचायत समिती गटर करण्यास असमर्थता दाखवत आहे. मुख्यमंत्री सडक योजनेत रस्ता करतेवेळी गटारींचे नियोजन केले नाही. त्यामुळे रस्ता खराब होत आहे. यासाठी रस्त्याच्या बाजूकडील गटारींचेही बांधकामही व्हावे.
- युवराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.