नानीबाई चिखली - वीरगळ

नानीबाई चिखली - वीरगळ

02395
नानीबाई चिखलीत इतिहासाचा खजिना
लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे; संशोधनाची गरज

नानीबाई चिखली ता. २ ः चिखलीच्या संवर्धनासाठी झालेल्या युध्दात एखादा पुरुष (वीर), खाद्या स्त्रीने (वीरांगणा) बलिदान दिल्याची साक्ष येथे सापडलेले वीरगळ देते. भागात जैन धर्माचे प्राबल्य असण्याची शक्यता आहे. आढळलेल्या अनेक शिल्पांवरू गाव इतिहासाचा खजिनाच असल्याचे दिसून येते. येथील इतिहास उलगडण्यासाठी संशोधनाची गरज आहे, असे मत कोल्हापूर लेणी संवर्धन समितीचे सदस्य प्रभाकर कांबळे यांनी व्यक्त केले.
''नानीबाई चिखलीत सापडली वीरगळ'' अशा आशयाची बातमी दै. ‘सकाळ’ने २५ मे च्या अंकात प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत कोल्हापूर लेणी संवर्धन समितीचे प्रभाकर कांबळे, पांडुरंग प्रधान, प्रदीप सातपुते, योगेश कांबळे, मोहींदर लिगाडे, सुकन्या लिगाडे आदींनी भेट दिली. यावेळी वीरगळ पाहणीवेळी ते बोलत होते.
प्रभाकर कांबळे म्हणाले, ‘मगदूम गल्लीत सापडलेली वीरगळ तीर्थंकर साधूंची असून याचे संदर्भ सदाशिव टेटविलकर यांच्या ‘महाराष्ट्रातील वीरगळ’ पुस्तकामध्ये सापडतात. वीरगळीवरून लक्षात येते की, भागात शैव पंथ व जैन धर्माचे प्राबल्य असण्याची शक्यता आहे. गावात शेकडो वर्षांपूर्वी एखादा वीर तसेच वीरांगणा होऊन गेल्याचे लक्षात येते. वीरगळीत बाण, भाले, तलवार, ढालीचीही चित्रे आहे. सापडलेली अनेक शिल्पे हजार, बाराशे वर्षापूर्वीची असल्याचे लक्षात येते. यावरून गावाला वैभवशाली इतिहास असून यासाठी संशोधनाची गरज आहे. ही माहिती पुढील पिढीसमोर ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच अल्लाबक्ष सय्यद, सदस्य श्रीशैल नुल्ले, अजित मगदूम, राजेंद्र कोरे, विशाल चिखलीकर, गजानन कांबळे, भारत मगदूम, बाबासो कांबळे, बाबासाहेब मगदूम, विजय मगदूम, वैभव गळतगे उपस्थित होते.

कोट
नानीबाई चिखली गावात वीरगळ व अनेक मुर्त्यांचा खजिनाच सापडत आहे. या गोष्टी चिखलीच्या ऐतिहासिक असल्याचे पुरावे देतात. यामुळे याचे शास्त्रशुद्ध संशोधन होणे गरजेचे आहे. असे झाल्यास नवीन पिढीसाठी हा एक अनमोल खजिन असेल.
- प्रभाकर कांबळे ( लेणी अभ्यासक )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com