नानीबाई चिखली - गुणवंत विद्यार्थी सत्कार

नानीबाई चिखली - गुणवंत विद्यार्थी सत्कार

Published on

2766
कौलगे ः परिवर्तन सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शिक्षण विस्तार अधिकारी एस. एम. कुकडे, ह.भ.प. सचिन पवार आदी.
.........
शैक्षणिक कार्यात परिवर्तनचे
योगदान प्रेरणादायी ः कुकडे

सकाळ वृत्तसेवा
नानीबाई चिखली, ता. १८ ः ‘कागल तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या प्रवासात परिवर्तन सामाजिक विकास संस्थेने दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. यामुळे तालुक्याच्या शिक्षण विभागाने गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना वारकरी परंपरेचे मिळणारे बळ कौतुकास्पद आहे,’ प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी एस. एम. कुकडे यांनी केले.
कौलगे (ता. कागल) येथे परिवर्तन सामाजिक विकास संस्थेने शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे मुख्य प्रवर्तक हभप सचिन पवार प्रमुख उपस्थित होते. १० फेब्रुवारी रोजी संस्थेने घेतलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेस चौथी व सातवीचे ४३०० विद्यार्थी बसले होते. यामधील चौथीचे २३ व सातवीमधील १३ गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिन पवार यांनी यापुढेही निरपेक्ष भावनेने परिवर्तन संस्था शिक्षण विभागासोबत राहून सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. मधुकर भोसले, गजानन गुंडाळे, एस. के. पाटील, सदानंद पाटील, अमोल भोसले-पाटील, तानाजी पाटील, रमेश पाटील, अक्षय हासबे, शिवाजी कुंभार, बाळासाहेब ढवण, अनिल हासबे आदी उपस्थित होते. सुलोचना शिंदे यांनी स्वागत केले. अरविंद किल्लेदार यांनी प्रास्ताविक केले. संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश खोत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com