नानीबाई चिखली - उपसरपंच निवड
2783
जयश्री गळतगे
......
नानीबाई चिखलीच्या
उपसरपंचपदी गळतगे
नानीबाई चिखली ः येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुश्रीफ गटाच्या जयश्री महादेव गळतगे यांची नऊ विरुद्ध तीन मतांनी निवड झाली. सरपंच युवराज कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविस्तार अधिकारी सूर्यकांत कुंभार यांनी काम पाहिले. कुमार संकपाळ यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त होते. मंगळवारी उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी जयश्री गळतगे व साधना जाधव असे दोन अर्ज आले होते. हात वर करून झालेल्या मतदानामध्ये गळतगे यांच्या बाजूने नऊ, तर जाधव यांच्या बाजूने तीन सदस्यांनी हात वर केला. एक सदस्य गैरहजर राहिले होते. यावेळी प्रवीणसिंह भोसले, शिवानी भोसले, सदाशिव तुकान, सर्व सदस्य, पांडुरंग गळतगे, प्रकाश वाडकर, महेश गळतगे, सचिन सूर्यवंशी, बाबूराव वाडकर, बुरहान सय्यद, दीपक देवडकर आदी उपस्थित होते. अल्लाबक्ष सय्यद यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

