

कडूबाई खरात यांचा शनिवारी गायन कार्यक्रम
नानीबाई चिखली ः गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भीमकन्या कडूबाई खरात यांचा शिव, शाहू, फुले, आंबेडकर गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (ता. १६) सायंकाळी सातला पंचशीलनगरमधील थळोबा माळ येथे कार्यक्रम होईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्याहस्ते उद्घाटन होईल. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, कागल पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती इंद्रजीत पाटील, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, युवराज पाटील, भैय्या माने, जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, पंचायत समिती सदस्या सुवर्णा जाधव, सरपंच युवराज कुंभार व मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमासाठी उपस्थितीचे आवाहन संयुक्त जयंती कमिटी पंचशील तरुण मंडळ, बौद्ध नगर, आण्णा भाऊ साठे नगर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.