नृसिंहवाडीत स्वामी समर्थ प्रकट दिन संइ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडीत स्वामी समर्थ प्रकट दिन संइ
नृसिंहवाडीत स्वामी समर्थ प्रकट दिन संइ

नृसिंहवाडीत स्वामी समर्थ प्रकट दिन संइ

sakal_logo
By

नृसिंहवाडीत स्वामी समर्थ प्रकट दिन
नृसिंहवाडी ता. २५ ः येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात (दत्तधाम) श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्री स्वामी समर्थच्या जयघोषात हजारो भाविक, सेवेकरांच्या उपस्थितीत झाला.
यानिमित्त सकाळी आठला भूपाळी आरती, यानंतर परब्रह्म स्वामी महाराजांना अभिषेक झाला. सकाळी नऊ वाजता श्री स्वामीयाग, साडेदहा वाजता महानैवेद्य आरती झाली. आरतीनंतर पालखी सोहळा होऊन स्वामी चरित्र सारामृत पाठाचे सामूहिक वाचन झाले. दुपारी बारा वाजता मांदियाळी महाप्रसाद झाला. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. दिवसभरात मानवी समस्यांवर विनामूल्य मार्गदर्शन झाले. दुपारी स्वामी समर्थ जप, मनन, चिंतन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यामध्ये बालसंस्कार व युवा प्रबोधनच्या युवा युवतींनी आध्यात्मिक कार्यक्रम सादर केला. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा होऊन औदुंबर प्रदक्षिणा झाली. सायंकाळी साडेसहा वाजता महानैवेद्य आरती झाली. दिवसभर हजारो सेवेकऱ्यांनी उत्साहात श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ व नामजप करून सेवा स्वामी समर्थ चरणी रुजू केली. रात्री साडेआठला चरणसेवा झाली. रात्री उशिरापर्यंत श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा होत्या. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मंदिरात आकर्षक रांगोळी काढून रंगीबेरंगी फुलांनी सजविले होते.