नृसिंहवाडी येथे टेंबे स्वामी उत्सवानिमित्त स्वाहाकार संपन्न

नृसिंहवाडी येथे टेंबे स्वामी उत्सवानिमित्त स्वाहाकार संपन्न

Published on

००९८६
...
टेंबे स्वामी उत्सवानिमित्त
नृसिंहवाडीत स्वाहाकार
सकाळ वृत्तसेवा
नृसिंहवाडी, ता. ३ ः येथील दत्त मंदिरात आज वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज उत्सवानिमित्त सर्व आरिष्ट शांतीसाठी पवमान स्वाहाकार करण्यात आला. याचे यजमान पद आदिती व आशिष खातेदार पुजारी यांनी भूषवले.
स्वाहाकारामध्ये गणपती पूजन, पुण्याहवाचन, ब्रह्मदिमंडल, नवग्रह व मुख्य देवतास्थापन करून होमहवन केले. क्षेत्रपाल पूजन, पूर्णाहुती होऊन आरती व मंत्रपुष्प झाल्यावर प्रार्थना केली. पवमान स्वाहाकार यागाचे पौरोहित्य विश्वेश्वर उपाध्ये यांनी केले. यावेळी विवेक पुजारी, विश्वेश्वर उपाध्ये, दामोदर उपाध्ये, सचिन उपाध्ये, श्रीकांत कोडणीकर, संजय शिरटीकर, संदीप वाडीकर, गिरीश कोडणीकर, महादेव जमखिंडीकर आदी उपस्थित होते.
दत्त देव संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी, सचिव संजय पुजारी, सदाशिव जेरे, पांडुरंग रुक्के, विपुल हावळे, गजानन गेंडे, आनंद पुजारी, वल्लभ रुक्के यांच्यासह दत्तभक्त व भाविक उपस्थित होते. दत्तयाग झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.