नृसिंहवाडीत गीता जयंती संपन्न

नृसिंहवाडीत गीता जयंती संपन्न

Published on

भगवद्गीतेत जीवनाचा
अर्थ ः प्रा. रुपाली वाडेकर
नृसिंहवाडी, ता. १३ ः ‘‘भगवद्गीतेत जीवनाचा अर्थ सामावला आहे. गीतेतील कर्मयोगात मनुष्याच्या निहित कर्माचा सिद्धांत मांडला आहे. आयुष्यात जी संकटे येतील त्यांना तोंड देण्यासाठीचे सगळे मार्ग गीतेने प्रतिपादिले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा विस्तार करून अधिक सोप्या भाषेत गीतेतील मर्म सांगितले आहेत,’’ असे प्रतिपादन प्रा. रूपाली वाडेकर यांनी केले. त्या श्री दत्त सार्वजनिक वाचनालय व दत्त हायस्कूलतर्फे आयोजित गीता जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप कुलकर्णी हे होते.
प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. डॉ. मुकुंद पुजारी यांनी स्वागत व बी. जी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. दिलीप कुलकर्णी म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेची केलेली मीमांसा ही गीतेचे सर्वश्रेष्ठ रूप आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा भगवद्गीतेचे अनेक अन्वयार्थ लावले जातात, हेच गीतेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कै. पां. ना. कुलकर्णी यांनी अत्यंत कष्टाने नाथपूर्व ज्ञानेश्वरीचे संशोधन करून प्रतिशुद्धता केली आहे.’’ विद्यार्थ्यांनी गीतेतील निवडक अध्यायांचे पठण केले. यावेळी मुख्याध्यापक सुधीर वाडीकर, साजिद मखमल्ला, अनिल कदम, शेखर विभूते, पी. एस. पुजारी, रणदिवे, निकम, सावगावे, स्वामी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार दर्शन वडेर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com