निसर्गाचा अभ्यास करून हवी रस्ते बांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गाचा अभ्यास करून हवी रस्ते बांधणी
निसर्गाचा अभ्यास करून हवी रस्ते बांधणी

निसर्गाचा अभ्यास करून हवी रस्ते बांधणी

sakal_logo
By

02108
जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) : येथील पाण्याचा टाका भागातील रस्ता पावसाळ्यात असा खचतो.
....
मालिका..
जोतिबा डोंगरचा रस्ता - भाग ३
...


पर्यावरणाचा अभ्यास करून
रस्ते बांधणी करण्याची गरज

निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर, ता. ९ : उंच डोंगर माथे असून पावसाळ्यातील रिपरिप, दाट धुके व जोरदार वाऱ्याचा सामना सहन करावा लागतो. या भागात कितीही दर्जेदार रस्ते केले, तरी त्याचे भवितव्य मात्र निसर्गाच्या हातात आहे. त्यामुळे येथे पर्यावरणाचा अभ्यास करून रस्ते बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
डोंगरचा मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाण्याचा टाका भागातील रस्ता जुलै महिन्यापासून पावसामुळे खचण्यास सुरुवात होते. खबरदारी म्हणून जूनलाच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. डोंगराकडे जाणारी सर्व वाहतूक गायमुख तलावमार्गे वळविण्यात येते. पाण्याचा टाका या भागात गेल्या दहा बारा वर्षांपासून रस्ता तुटून जातो. दरवर्षी हा रस्ता खचण्याची सुरुवात झाली की संभाव्य धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभाग मुरमाची चर मारून रस्ता पूर्णपणे बंद करते.
या ठिकाणी सलग दहा वर्षे रस्ता तूटून जात आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्याची तज्ञांमार्फत पाहणी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या पूरहानी योजनेतून दोन कोटी रुपये २०२० मध्ये मंजूर झाले होते. ठेकेदाराने एक आव्हान म्हणून या रस्त्याचे काम पूर्ण केले. हा रस्ता नव्याने दर्जेदार झाला. वाहतुकीस खुला केला. पावसाळा आल्यावर पुन्हा हा रस्ता खचला. २०२१ मध्येही दुसऱ्या ठेकेदाराने केलेला हा रस्ता खचला. रस्ता खचण्याची मालिका दरवर्षी सुरुच आहे. यामुळे निसर्गाचा अभ्यास करूनच आता रस्ता बांधणी करणे गरजेचे आहे.

------------
कोट
‘जोतिबा डोंगरच्या खचलेल्या रस्त्याचे काम मी एक आव्हान म्हणून स्वीकारले. रस्त्याचे काम करताना अनेक तज्ज्ञांची मदत घेतली आणि काम दर्जेदार करुन रस्ता वाहतुकीस खुला केला. पण अतिवृष्टीने पुन्हा रस्ता खराब झाला अजूनही या रस्त्याच्या वाढीव कामाची माझी बिले मिळालीच नाहीत. अधिकाऱ्यांनी वाढीव कामाचा प्रस्तावच तयार केला नाही. त्यांच्या बदल्या झाल्याने ते आता एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.
- शिवाजी काशीद, ठेकेदार