जोतिबा खेटे सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिबा खेटे सुरु
जोतिबा खेटे सुरु

जोतिबा खेटे सुरु

sakal_logo
By

2117,2118

जोतिबा डोंगर ः दख्खनचा राजा श्री जोतिबाची रविवारी खेट्यानिमित्त बांधलेली अलंकारिक महापूजा. दुसऱ्या छायाचित्रात भाविकांची झालेली गर्दी. (निवास मोटे : सकाळ छायाचित्रसेवा)
...

जोतिबा डोंगरावर ‘चांगभलं’चा गजर

खेटे सुरू : दीड लाख भाविकांची उपस्थिती


सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर, ता. १२ : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘यमाईदेवी, चोपडाईदेवी, महादेव, बद्री केदार, काळभैरवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील खेट्यांना आज पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. पहिल्या खेट्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली. मोठ्या गर्दीमुळे आज डोंगरास जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. ‘चांगभलं’च्या जयघोषांनी जोतिबाचा डोंगर दणाणून गेला.
आज पहाटेपासूनच भाविक डोंगरावर येण्यास सुरुवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत डोंगरावर मोठी गर्दी होती. दुपारनंतर गर्दी थोडी कमी झाली. सायंकाळनंतर मात्र भाविकांच्या झुंडी डोंगरावर येत होत्या. आज मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. यावेळी केदार कवच, केदार स्तोत्र, केदार महिमा या विधींचे पठण करण्यात आले. सकाळी दहा वाजता श्री जोतिबा देवाची आलंकारिक महापूजा बांधण्याता आली. दुपारी बारा वाजता धुपारती सोहळा झाला. आज भाविकांना नव्याने बांधण्यात असलेल्या दर्शन मडंपातून दर्शन रांगेची सोय केली. त्यामुळे या भाविकांचे उन्हापासून संरक्षण झाले. आज दर्शन रांग दक्षिण दरवाजापर्यंत गेली. रात्री चांगभलंच्या जयघोषात भव्य पालखी सोहळा झाला. भाविकांनी पालखीवर तसेच शिखरावर गुलाल खोबऱ्यांची उधळण केली.
.. . .. . . .

ड्रोन कॅमेऱ्यातून गर्दीवर नजर

जोतिबा डोंगरावर खेट्यांच्या वेळी अनेकजण उद्धट वर्तन करून दंगा करतात. याला आळा घालण्यासाठी शनिवारपासून सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवली. त्यामुळे हुल्लडबाजीस आळा बसला. पोलिस विभागाच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्टू देवस्थान समितीने ड्रोन कॅमेऱ्यातून गर्दीवर नजर ठेवली.

... .. ..
चौकट

जोतिबाची चैत्र यात्रा ५ एप्रिलला

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यंदा ५ एप्रिल रोजी होत आहे. या संदर्भात ग्रामस्थ, पुजारी, शासकीय अधिकारी, सासनकाठी चालक, व्यापारी, दुकानदार, सेवाभावी संस्था, अन्नछत्र चालक यांच्या बैठका खेटे झाल्यानंतर होणार आहेत. यात चैत्र यात्रेचे नियोजन होणार आहे.