जोतिबा मंदिराची यात्रेनिमित्त स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिबा मंदिराची 
यात्रेनिमित्त स्वच्छता
जोतिबा मंदिराची यात्रेनिमित्त स्वच्छता

जोतिबा मंदिराची यात्रेनिमित्त स्वच्छता

sakal_logo
By

02186
जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) : येथील मंदिरात सोमवारी चैत्र यात्रेनिमित्त स्वच्छता करण्यात आली. (निवास मोटे : सकाळ छायाचित्रसेवा)

जोतिबा मंदिराची
यात्रेनिमित्त स्वच्छता
जोतिबा डोंगर, ता. २० : येथील श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात आज चैत्र यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता (पाकाळणी) करण्यात आली. सकाळी आठ वाजता या स्वच्छतेच्या कामास प्रारंभ झाला. जोतिबा मंदिर, नंदी महादेव, चोपडाई काळभैरव, यमाईदेवी या मंदिरांमध्ये आतून-बाहेरून स्वच्छता झाली. तसेच सर्व मंदिरांत देवाता कृत्यासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य स्वच्छ करण्यात आले.
जोतिबा परिसरातील शिखरांची अग्निशामक दलाच्या बंबाने शेवाळ, झुडपे काढण्यात आली. मंदिरातील नारळाच्या शेंडी प्लास्टिक कचरा ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या सहाय्याने बाहेर काढला. या स्वच्छता मोहिमेसाठी ग्रामस्थ, पुजारी, भाविक देवस्थान समितीचे कर्मचारी, बी. व्ही. जी. ग्रुप, पुणे यांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. वारणा सहकारी दूध संघाचे बंब या स्वच्छता मोहिमेसाठी आणले होते.
दरम्यान, शिखरांची रंगरंगोटी दोन दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अधीक्षक दीपक मेहतर यांनी दिली. आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नूतन सचिव सुशांत बनसोडे यांनी आज जोतिबा डोंगरावर मंदिर परिसराची पाहणी केली व कर्मचारी वर्गाला यात्रेच्या अनुषंगाने विविध सूचना दिल्या.